*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर आंबोली-तेरवण मुक्कामी एसटी बस उपलब्ध : ग्रामस्थांमध्ये समाधान*
*दोडामार्ग : शुभम गवस*
तेरवण येथे रात्रीची मुक्कामी एसटी बस मिळावी अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती,मात्र आता या मागणीला पूर्णविराम मिळाला आहे.बुधवार दि-२९ जानेवारी पासून रात्री आंबोली-तेरवण अशी मुक्कामी एसटी बस तेरवण गावाला मिळाल्या बद्दल ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
७५ वर्षांत पहिल्यांदाच ही एसटी बस सुरू झाल्या मुळे तेरवण वासियां कडून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच मोठ्या जल्लोषात एसटी बस चे देखील आरती ओवाळत गावात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी तुकाराम गवस, शंकर गवस, नामदेव कृष्णा गवस, पांडुरंग सखाराम गवस, पांडुरंग रामा गवस, वासुदेव गवस, दत्ताराम गवस, दत्ताराम कांबले, मारुती गवस, जानु गवस, गोपाल गुणाजी गवस, जयराज तुकाराम गवस व इतर ग्रामस्थानी लालपरीचे आरती करुन स्वागत केले.