सकल मराठा समाजाच्यावतीने कणकवलीत राज्यस्तरीय पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा १९ फेब्रुवारीला

सकल मराठा समाजाच्यावतीने कणकवलीत राज्यस्तरीय पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा १९ फेब्रुवारीला

*कोंकण एक्सप्रेस*

*सकल मराठा समाजाच्यावतीने कणकवलीत राज्यस्तरीय पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा १९ फेब्रुवारीला*

*कणकवली : प्रतिनिधी*

शिवजयंती उत्सवानिमित्त कणकवली सकल मराठा समाजाच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी यथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यस्तरीय पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २१ हजार रुपये व चषक, द्वितीय १५ हजार रुपये व चषक, तृतीय ११ हजार रुपये व चषक तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या लोकनृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महेंद्र सांब्रेकर ९८६०३११२७७, बच्चू प्रभुगांवकर, सुशिल सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!