*कोंकण एक्सप्रेस*
*तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालवा फुटीबाबत वस्तुस्थिती दर्शक माहिती*
*सिंधुदुर्गनगरी : जि.मा.का*
दि.21 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता गाव मौजे घोटगे ता. दोडामार्ग येथील तिलारी उजवा तीर कालवा किमी 9 मधील सा .क्र. ८/९३० मी . येथील केर जलसेतूचा पहिला Span (GRP Pipe Aquaduct ) कोसळल्याचे निदर्शनास आले. सदर जलसेतूचे दगडी बांधकाम हे सुमारे 30 ते 35 वर्षापुर्वी झालेले आहे. यापुर्वी दि. 10 जानेवारी 2024 रोजी जलसेतुच्या एका span मधुन गळती निदर्शनास आल्यामुळे तात्काळ त्याची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित केला होता. दि. 04.05.2024 या दिवशी सदर जलसेतूच्या दुस-या Span मधुन गळती निदर्शनास आली होती. दोन्ही घटनांवेळी शेतक-यांकडुन होणारी पाण्याची मागणी लक्षात घेता तातडीने या जलसेतुची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्ती कामामध्ये प्रामुख्याने गंजलेले Steel Trusses पुर्णपणे बदलण्यात आले होते. आता जलसेतुच्या उर्ध्व बाजुच्या abutment च्या वरील दगडी भागाचे Morter कमकुवत झाल्याने ते क्षतीग्रस्त होऊन जलसेतुच्या लोखंडी आधारावर कोसल्यामुळे पहिल्या गाळ्यातील 15 मी. लांबीतील जलसेतु ढासळला आहे. त्यामुळे यापुर्वी गतवर्षी आपत्कालीन परिस्थीतीमध्ये केलेले स्टिलचे काम निकृष्ट दर्जाचे होते यात तथ्य नसल्याचे कार्यकारी अभियंता वि बा जाधव यांनी कळविले आहे.
हा जलसेतु केर नाल्याच्या तळापासुन सुमारे 7 ते 8 मी उंचीवर असुन, जलसेतुसाठी 1600 मि. मि. व्यासाच्या GRP Pipe वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जोडणीसाठी व दुरुस्तीसाठी विशेष प्रकारच्या साहित्याची व यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे. आवश्यक बाबिंची जुळणी होताच काम पुर्ण करण्यात येईल. काम 03 फ़ेब्रुवारी पर्यंत पुर्ण करणे नियोजीत आहे. दि. 24.01.2025 रोजी तिलारी डावा तीर कालवा किमी 14 मधील सा.क्र. 13/110 मी वरील पाईप मोरीतुन गळती होवून सेवा पथाकडील कालव्याच्या भरावाची माती वाहून गेली . गळतीमुळे कालव्याचे पाणी पाईप मोरीतून नाल्याव्दारे आजूबाजूच्या शेतामध्ये तसेच मणेरी- कुडासे रस्त्यावर पसरले होते. तिलारी कालव्याची बांधकामे सुमारे 30 ते 35 वर्षापुर्वी म्हणजेच सन 1984 ते 1995 या कालावधीत झालेली आहेत.
पाईप मोरीच्या ठिकाणचे पाईप हे बऱ्याच ठिकाणी कमकुवत झालेले आहेत. त्यामुळे सदर पाईप मोरीतील एक पाईप फ़ुटल्यामुळे त्यावरील भराव खाली बसला व त्यामुळे कालव्यातील पाणी हे भरावामध्ये घुसले व पाणी भरावात घुसलेने सेवा पथाकडील भराव खचला व कालव्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असलेने कालव्याचा 2 ते 3 मी. लांबीतील भराव वाहुन गेला. सदरचे पाणी हे त्याच पाईप मोरी मधुन फ़ार मोठ्या प्रमाणात वाहुन गेले आहे. तथापी नाला पात्र छोटे असलेने व कालव्याचा विसर्ग जास्त प्रमाणात असलेने नाल्याच्या बाहेर पाणी पडुन आजुबाजुच्या शेतीच्या व घरांच्या बाजुने पाणी वाहुन गेले आहे. दि. 17.08.2024 रोजी निरिक्षण पथाकडील बाजुस कालवा फ़ुटला होता. त्यावेळी तातडीने कालव्याची दुरुस्ती करुन गोवा राज्यास पाणी पुरवठा सुरळित केला होता. त्यावेळी सेवापथाकडील RCC पाईपची पाहणीही करण्यात आली होती व पाईप सुस्थितीत आढळुन आल्या होत्या . तथापी पाईप बसवुन झालेला दिर्घ कालावधी, त्यावरील पाणी व माती भराव यांच्या वजनाने पाईप कमकुवत झाल्या आहेत हि वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सेवा पथाकडील बाजुचा पाईप फ़ुटुन भराव खाली बसल्याने सदरची घटना झालेली आहे. यापुर्वी केलेले निरिक्षण पथाकडील बाजुचे काम सुस्थितीत आहे व त्याचा दर्जाही चांगला आहे. त्याला कोणतीही बाधा पोचलेली नाही. केलेले काम दुबार केलेले नाही.
केर नाल्याच्या पहिल्या span चे आपत्कालीन काम श्री. दत्ताराम टोपले यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे डाव्या कालव्याच्या निरिक्षण पथाकडील आपत्कालीन कामही त्यांनीच केले आहे. प्रकल्पामध्ये उजवा कालवा , डावा कालवा , जोड कालवा ,बांदा शाखा कालवा यांची पुर्ण झालेली एकुण लांबी जवळपास 98 किमी आहे. महाराष्ट्र हद्दीतील जवळपास 30 गावे व गोवा हद्दीतील उत्तर गोवा जिल्हा यांच्या दृष्टीने कालव्यामध्ये सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो. त्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टिने मजुर पुरविण्याची निविदा ही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत कालव्याच्या ठिकाणी ते स्वत: व त्यांचे मजुर व त्याचेकडे असलेली मशिनरी यांना पाचारण करावे लागते. त्यामुळे स्थानिक पत्रकार, जनता यांना आपत्कालीन जागेवर त्यांचा वावर दिसतो. त्याचप्रमाणे कालवा फ़ुटीच्या दोन्ही घटना या पुर्वी केलेल्या कामाच्या जवळपास झाल्याने जनतेमध्ये गैरसमज निर्माण झाले. प्रत्यक्षात कार्यक्षेत्रावर विभागामार्फ़त कालव्याच्या दुर्घटनेच्या ठिकाणी सर्व संबधित शेतकरी यांना याबाबतची सर्व वस्तुस्थिती समजावुन सांगितली आहे. तथापी घटनेच्यावेळी सर्वचजण संतप्त असल्याने व नंतरच्या वाटाघाटीवेळी पत्रकार व इतर सन्माननीय लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने गैरसमज निर्माण झाले. कंत्राटदारामार्फ़त पुर्वी केलेली दुरुस्ती कामे चांगल्या दर्जाचे नसल्याने या दोन्ही घटना घडल्या या म्हणण्यामध्ये तथ्य नाही.
तिलारी कालवे हे जुने झाले आहेत. कालव्याची चिरामाती ही पाणी धरुन ठेवण्यासाठी सक्षम नाही. त्यामधुन पाझर होऊन व पाईपिंग होऊन अशा घटना घडतात. सर्व कालव्यांचे संधानक अस्तरीकरण व बाधकामे यांचे नुतनिकरण करण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आहे. त्यास मान्यता मिळुन गोवा राज्याच्या धर्तीवर त्याची निविदा प्रक्रिया होऊन पावसाळ्यानंतर सदरचे कालवा नुतनिकरण काम हाती घेणेत येत आहे. कालवा कामांविषयी काहीही शंका मनात असल्यास विभागाचे कार्यकारी अभियंता ,उपअभियंता यांचेशी संपर्क साधावा ही विनंती.
या दोन्ही घटनांवेळी निम्नस्वाक्षरीकार यांनी तात्काळ कार्यक्षेत्रावर जात अधिकारी व कर्मचा-यांना दुरुस्तीबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधुन कालवा फ़ुटीची कारणे स्पष्ट केलेली होती. मा. पालकमंत्री ,सिंधुदुर्ग यांची भेट घेत त्यांनाही सर्व परिस्थिती समजावुन सांगीतली आहे. तरी जनतेच्या मनात गैरसमज राहु नये यासाठी या प्रसिद्धिपत्रकाद्वारे वस्तुस्थितीदर्शक माहीती जनतेपर्यंत पोचवावी.