कोंकण एक्सप्रेस
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४ प्रदान
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान
*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात रू.२५००ते ३००० कोटी सभासद ठेवी गोळा करणे या विभागामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. आरबीआय चे माजी मुख्य महाव्यवस्थापक भार्गेश्वर बँनर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे,रविंद्र मडगांवकर, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँक अधिकारी दत्ताराम गावडे यांनी स्वीकारला.यावेळी बँकोचे मुख्य संपादक अविनाश शित्रे-गुंडाळे, गँलक्सी लन्मा पूणे संचालक अशोक नाईक आदि मान्यवर उपस्थित होते. अविज पब्लिकेशन , कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिले जातात. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या गटातून रू.२५००ते ३००० कोटी ठेवी गोळा करणे विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आला. मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५रोजी अँम्बी व्हँली सिटी,लोणावळा येथे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. देशभरातील अग्रगण्य अश्या १०० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा बँकेचे सर्व संचालक,अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली