कोंकण एक्सप्रेस
महाविद्यालयात म्युचुअल फंड गुंतवणूक या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न….
दोडामार्ग, २९./शुभम गवस.
लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग आणि ब्लूचिप यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात म्युचुअल फंड गुंतवणूक या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. म्युचुअल फंडमध्ये गुंतुवणूक कशी आणि कोणत्या पद्धतीने करावी याबाबत बोलत असताना एस.बी.आय. चे शाखा व्यवस्थापक श्री तुषार शिर्के यांनी सांगितले की एस.बी.आय.च्या म्युचुअल फंडच्या एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळतो, आपणास जास्तीचा फायदा नफा मिळवायचा असेल तर गुंतुवणूक जास्तीची असावी. तसेच कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करत असताना आपले उद्दिष्ट निश्चित असावे, आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा गुंतवणूक करावा जेणेकरून भविष्यातील अडचणीना सामोरे जाता येईल. आपल्या उत्पन्नाच्या नियोजनानुसार भविष्यातील लाभघेता येत असतात. असे अनेक गुंतवणूकीचे मार्ग त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. गुंतवणूक करताना त्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. कारण काही गुंतवणूक कर मुक्त तर काही गुंतवणकीला कर असतो. त्याबाबी गुंतवणूक करत असताना विचारात घ्यावा असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. पैसा आणि गुंतवणूकीचा थोडाफार अभ्यास असला की ती गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. चांगल्या गुंतवणुकीचा फायदा सर्वांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते श्री. तुषार शिर्के, श्री. राजेश राऊळ, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. यू. दरेकर, श्री. चैतन्य पवार, श्री. सुशांत इंदुलकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. यू. दरेकर, सूत्रसंचालन कु. सानिया गवंडळकर तर आभार कु. पंकजा मणेरीकर हिने मानले.