सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचा सचिव पदाचा सुधीर पराडकर यांचा राजीनामा

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचा सचिव पदाचा सुधीर पराडकर यांचा राजीनामा

कोंकण एक्सप्रेस

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचा सचिव पदाचा सुधीर पराडकर यांचा राजीनामा

कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघटनेच्या सचिव सुधीर पराडकर यांनी सचिव पदाचा राजीनामा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबिंद्रे यांच्याजवळ पाठविला आहे. ते संघटनेचे संस्थापक सचिव म्हणून काम पाहत होते.
सुधीर पराडकर यांनी वाढते वय, कौटुंबिक अडचणीमुळे काम करू शकत नसल्याने तसेच अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे मी राजीनामा देत आहे असे म्हटले आहे.संघटना स्थापनेपासून सर्व जिल्हाध्यक्षांनी व जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालकानी मानाची वागणूक दिली. त्या सर्व जिल्हाध्यक्षांचा व सर्व रिक्षाचालकांचा मी आभारी आहे, असे त्यांनी सांगितले.यापुढे मी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव म्हणून नियमित काम पाहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांची कामे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने करणार आहे, असे श्री. पराडकर यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!