माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना मागदर्शन

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना मागदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना मागदर्शन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- मंगळवार, दिनांक- २८ जानेवारी २०२५ रोजी, प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना शरीराचे आरोग्य व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.*

*उत्तम व चांगले आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. याच अनुषंगाने प्रशालेत वर्षभर मुलांना विविध प्रकारे आरोग्य विषयक मार्गदर्शन व शिबीरे आयोजित केली जातात. उत्कर्षा अंतर्गत विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक सौ. दिक्षा दिपक कांबळे, वरिष्ठ परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्र, फोंडाघाट यांनी विद्यार्थिनींना शरीराचे आरोग्य व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.गेल्या २३ वर्षे पासून आरोग्य कर्मचारी या पदावर कार्य करत असताना समाजातील महिला, मुलींना मानसिक व शारिरीक आणि महिला अत्याचार या विषयी मार्गदर्शन करत असतात. प्रशालेतील मुलींच्या समस्या लक्षात घेऊन शरीराचे आरोग्य व संवर्धन या विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.*

*सदर उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी यांनी विद्यार्थीनींना वैयक्तीक स्वच्छता विषयक बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होते.*

*या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षिका साटम मॅडम यांनी केले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!