*कोंकण एक्सप्रेस*
*’घर घर संविधान’ उपक्रमअंतर्गत मान्यवरांना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे वाटप*
*सिंधुदुर्गनगरी :प्रतिनिधी*
समाजिक न्याय व विशेष विभागामार्फत ‘घर घर संविधान’ उपक्रमअंतर्गत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाकडून 26 जानेवारी रोजी पोलीस परेड मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्याकडून मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे,जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवरांना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले.
तसेच अनु. जाती उपायोजना अंतर्गत निधीतून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत समाज कल्याण विभगातील विविध योजनेची प्रसिध्दी करण्यासाठीच्या मोबाईल व्हॅन चे मत्स्य व्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री तिनेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यालय प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.