*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरेत कासार्डे हायस्कूलच्या खेळाडुंची चित्तथरारक ज्युदो- कराटेची प्रात्यक्षिके*
*बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली*
*कासार्डे : संजय भोसले*
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ज्युडो कराटे खेळाडुंनी रिक्षा संघटना तळेरेतील रंगमंचावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.या प्रात्यक्षिकांमध्ये 21 मुले 22 मुलींसह 43 खेळाडूंचा सहभाग होता.खेळाडूंनी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा ज्युडो कराटे ब्लॅक बेल्टधारक दत्तात्रय मारकड,प्रा.देवेंद्र देवरुखकर,प्रा.श्रीकृष्ण कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यूदो कराटेमधून सेल्फ डिफेन्स,आगीतून जम्प,मानवी मनोरे,लाठीकाठी अशी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
या शिवाय याठिकाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौ.सविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोंधळ नृत्य,कु.प्रा.प्रियंका सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर नृत्य,आणि ज्युनिअर ड्रामा क्विन आणि विद्यालयातील इ.५ वीतील विद्यार्थ्यिनी कु.सावी मुद्राळे आणि इ.7वी तील विद्यार्थी कैवल्य मुंडले यांनी सौ.विधी मुद्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेली ‘संत गोरा कुंभार ‘यावर आधारित नाटीका अभियानाचा सर्वोउत्कृष्ट बिंदू ठरली.
तत्पूर्वी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची कासार्डे हायस्कूल ते तळेरे बसस्थानक प्रभातफेरी निघाली.या रॅलीत शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह,विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही राणे, कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,सरचिटणीस रोहिदास नकाशे इतर पदाधिकारी तसेच स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे इतर पदाधिकारी,स्कुल कमिटी पदाधिकारी सहभागी झाले होते.