*कोंकण एक्सप्रेस*
*दुंडागड वरती होणार २५ मोहीम : किल्ल्याचा महादरवाजा होणारा मोकळा*
*देवगड : प्रतिनिधी*
मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य,{ रजि }, कणकवली विभाग यांच्या संकल्पनेतून आणि चाफेड ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने दुंडागड / दुर्गाचा डोंगर (चाफेड. ता.देवगड,सिंधुदुर्ग ) या किल्ल्यावर मुख्य प्रवेशद्वार उत्खनन च्या २०२५ मधे ऐकून २५ मोहीम होणार आहेत त्या पैकी तीन मोहीम यशस्वी पार पडल्या आहेत.या तीन मोहीम मधे मुख्य प्रवेशद्वार च काम ३० % पूर्ण झालं असून उर्वरित काम नियोजित मोहीम मधे करण्यात येईल .
उर्वरित मोहीम च्या तारखा खालील प्रमाणे.
चौथी मोहीम – २३ फेब्रुवारी,पाचवी मोहीम – ०९ मार्च.सहावी मोहीम – २३ मार्च,सातवी मोहीम – ०६ एप्रिल,आठवी मोहीम -२० एप्रिल,नववी मोहीम. -०४ मे,दहावी मोहीम -१८ मे,अकरावी मोहीम -01 जून,बारावी मोहीम -१५ जून,तेरावी मोहीम – २९ जून,चौदावी मोहीम -१३ जुलै,पंधरावी मोहीम -२७ जुलै,सोळावी मोहीम -१० ऑगस्ट,सतरावी मोहीम -२३ ऑगस्ट,अठरावी मोहीम – ७ सप्टेंबर,१९ वी मोहीम -२१ सप्टेंबर,२० वी मोहीम -०५ ऑक्टोबर,२१ मोहीम – १९ ऑक्टोंबर,२२ वी मोहीम -०२ नोव्हेंबर,२३ वी मोहीम -१६ नोव्हेंबर,२४ वी मोहीम -३० नोव्हेंबर,२५ वी मोहीम -१४ डिसेंबर
यातील अनेक मोहिमांना सिंधुदुर्ग. मधील अनेक शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आव्हान संघाचे अध्यक्ष सुमित कुशे यांनी केलं आहे.तरी मोहीम साठी लागणारे सहकार्य आणि मदत आम्ही आमच्या चाफेड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या कडून करत राहू अस चाफेड सरपंच श्री.किरण मेस्त्री यांनी म्हटल आहे.ज्यांना मोहिमेला उपस्थित राहता येत नसेल त्यांनी आर्थिक मदत किंव्हा खोदकाम साठी लागणारे सामान देऊन सहकार्य करू शकता.
सहकार्यासाठी संपर्क :- प्रियंका नरे- +९१ 96३७ ५६ ८५५८