दरवाढ कमी करून प्रवाशांना पूर्ववत सवलती सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर

दरवाढ कमी करून प्रवाशांना पूर्ववत सवलती सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*दरवाढ कमी करून प्रवाशांना पूर्ववत सवलती सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर*

*एसटी दरवाढी विरोधात मालवण बसस्थानकात ठाकरे शिवसेनेची निदर्शने*

*मालवण : प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २५ जानेवारी पासून १४.९५% एवढी दरवाढ केलेली आहे.महायुती सरकार स्थापन झाल्यापासून एस टी बसेच्या बऱ्याच सवलती रद्द करण्यात आल्या आहेत.जेष्ठ नागरिक,महिला प्रवास तसेच एसटीच्या प्रवास वाहतूक सुद्धा दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी मालवण बस स्थानक परिसरात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.ही दर वाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उप नगराध्यक्ष महेश जावकर, युवासेनेचे तालुका समन्वयक मंदार ओरसकर, किरण वाळके, नितीन वाळके, उमेश मांजरेकर, गणेश कुडाळकर, दीपा शिंदे, नरेश हुले, किशोर गावकर, चंदू खोबरेकर, गणेश चव्हाण, चिंतामणी मयेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर, निनाक्षी शिंदे, शिल्पा खोत, दिलीप परब, राहुल जाधव, मोहन मराळ, यशवंत गावकर, झोया खान, रुखिया शेख आदी उपस्थित होते. यावेळी आगरप्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसटीच्या दरवाढीमुळे महिला व जेष्ठ नागरिक यांच्या सवलती कमी करण्यात आल्या आहेत. महागाईमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या जनतेला या भाडेवाडीमुळे अजून भरडण्याच काम या महायुती सरकार कडून सुरु आहे. एकीकडे मोफत योजना व दुसरीकडे गाड्या वेळेवर न मिळणे, चालक- वाहक कमतरता यामुळे जनता त्रस्त असतानाच त्यात थेट १४.९५% एवढी प्रवासी भाडेवाढ मुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासासाठी आम्ही या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोध करत जाहीर निषेध करत आहोत.तरी हि दरवाढ कमी न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!