*कोंकण एक्सप्रेस*
*झाराप पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
*कुडाळ : प्रतिनिधी*
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने झाराप पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी १०.०० वाजता संपन्न झाला.
या मेळाव्यामध्ये झाराप गावचे सरपंच सौ. दक्षता दशरथ मेस्त्री, उपसरपंच मा. मंगेश भास्कर गावकर, ग्रामसेवक बापूसाहेब निवृत्ती फुंदे सर, श्री नाईक सर, श्री नरेंद्र बिडये सर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा सम्वयक अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.तसेच सरपंच मेस्त्री मॅडम व ग्रामसेवक फुंदे सर यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले.
पुनर्वसन केंद्राच्या वतीने उपस्थित दीव्यांग बांधवाना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. या मेळाव्याला ४० हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व दीव्यांग बांधवांना उपहार देण्यात आला. तसेच पुनर्वसन केंद्राच्या वतीने धोंडू धर्माजी हरमलकर यांना वॉकर देण्यात आला.सुधा पेंडुरकर व विद्या साळगावकर यांना व्हीलचेअर देण्यात आली. श्री नरेंद्र बिडये यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.