*कोंकण एक्सप्रेस*
*मुलांसाठी धमाल नाविन्य तर पालकांना आठवले आपले बालपण !*
*कणकवली : प्रतिनिधी*
जीवन शिक्षण शाळा गोपुरीचे या पंधरवड्यातील सत्र विशेष होते. आई-बाबांच्या लहानपणीतील खेळ.यात विटू दांडू,टायर चालवणे,आबा दुबी, अची पची.काजीचा खेळ, लगोरी, काठीचा खेळ,तळ्यात मळ्यात,दोरी उडी,आईचा रुमाल हरवला,डोंगराला आग लागली,भोवरा फिरवणे,रिंग फिरवणे,सूरपारंब्या अशासारखे वीस पेक्षा जास्त जुने विस्मृतीत गेलेले आत्ताच्या मुलांनी कधीच न अनुभवलेले खेळ जीवन शिक्षण शाळे मार्फत आयोजित केले.या सत्राचा प्रारंभ तायक्वांदो , आर्चरी सारखे खेळ सिंधुदुर्गात रुजवणारे महेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाला यावेळी बोलताना महेश कुलकर्णी यांनी आयोजकांचे अशा अभिनव उपक्रमाबद्दल कौतुक केले व खेळाचे जीवनातील महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदीप सावंत यांनी पारंपारिक खेळामुळे मुलांना सामाजिक बांधिलकीचे भान येते, सहानुभूतीचा विकास होतो, शिकण्याचे कौशल्य वाढवण्यास मदत होते, हात आणि डोळे यांचा समन्वय सुधारतो, नेतृत्वगुण वाढीस लागतात, जिद्द, चिकाटी निर्माण होते म्हणून प्रत्येक पालकांनी मुलांचे बालपण आनंददायी करण्यासाठी या खेळाची कास धरून त्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे यासाठी यासाठी हा उपक्रम प्राधान्याने राबविल्याचे सांगितले.
२० पेक्षा जास्त खेळाचे नियोजन करणे आणि त्यासाठी प्रशिक्षक मिळविणे हे जिकरीचे काम होते यासाठी काही पालक व कणकवली परिसरातील क्रीडाप्रेमींनी आवर्जून मदत केली यात प्रामुख्याने संजय मालंडकर, दादा कोरडे, एकनाथ धनवटे, अमोल परब वसुधा माने, प्रियांका मिस्त्री, निकिता मिस्त्री, भावना ठाकूर, लाजरी वातकर, प्रा. मनीषा पाटील, सुरेश पवार, भाग्यश्री जाधव,भाई गुरव,सुरेश रासम, संगीता पाटील, लता पाटील, श्रेयश शिंदे, मयुरेश तिर्लोटकर, सतीश शिरसाठ, यांनी मोलाची मदत केली. या सत्रात खास राधानगरीहून अनिल बडदारे व दिनकर पाटील यांनीही सहभाग दर्शविला.
नेहमीप्रमाणे १४० पेक्षा जास्त मुलांनी यात सहभाग नोंदवला आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटला.यावेळचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांबरोबर पालकांनाही आपल्या या विस्मृतीत गेलेल्या बालपणाचा प्रत्यक्ष खेळून आनंद घेतला. मुलांच्या पालकांबरोबर कणकवली परिसरातील काही नागरिकही या खेळात सहभागी झाले व आपण पुन्हा एकदा बालपण अनुभवले असे आवर्जून सांगितले. मुलांनी टायर चालविणे,सुरपारंब्या, भोवरा फिरवणे, आबा-दुबी, लंगडी सारख्या काही खेळात खूप धमाल केली. सत्राचा समारोप झाला तरीही काही मुले व पालक पुढील तासभर खेळतच होते . या उपक्रमास कणकवली परिसरातील नागरिकांनी सदिच्छा भेट देत या पारंपारीक खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यात प्रामुख्याने सिंधु जिल्हयाचे माजी कृषी सभापती संदेश सावंत पटेल, मिलाग्रीसचे क्रीडा प्रशिक्षक हितेश मालंडकर, आचीर्णे गावचे विजय राणे. उद्योजक सुजीत काणेकर, व्यापारी संघाचे राजू पारकर,सौ .. पूजा सावंत, रमा काणेकर,अनिल हळदीवे तसेच गोपूरी आश्रम चे व्ही. के. सावंत,अमोल भोगले,अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे,सदाशिव राणे व अध्यक्ष प्रा. डाॅ. राजेंद्र मुंबरकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल गोपुरीचे सचिव बाळू मेस्त्री यांनी सर्वांचे आभार मानले.