*मळगाव येथे ‘इट राईट स्कूल ‘पोषण आहार बनविणाऱ्या महिलांकरिता एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग उपक्रम उत्साहात*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
बाल रक्षा भारत संस्था संचलित ‘Eat Right School’ प्रकल्प सिंधुदुर्ग आयोजित “पोषण आहार बनविणाऱ्या महिलांकरिता एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम मळगाव हायस्कूल येथे संपन्न झाला.केंद्र शासनाच्या भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण (Food Safety and Standard Authority of India) सुरक्षित अन्न व निरोगी आहाराची उपलब्धता आणि वापर सुनिश्चित करून अन्नसुरक्षा व पोषण बदलासाठी अनेक उपक्रमांपैकी एक जागतिक स्तरावरील मोंडेलिझ या कंपनीच्या अर्थसहाय्याने मुंबई शहर व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम सावंतवाडी तालुक्यातील एकूण ६५ शाळांमध्ये सदर प्रकल्पाचे काम सुरू आहे.
सदर प्रशिक्षण मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्या शुभहस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर बाळ रक्षा भारत संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री किरण थोरात, श्री शशिकांत सातार्डेकर, विद्या विकास हायस्कूल आरोसचे मुख्याध्यापक श्री. शिरीष नाईक, सौ. गोसावी, सौ. परुळेकर, दिल्ली च्या (FSSAI) प्रशिक्षण म्हणून लाभलेल्या श्रीमती अपर्णा गुप्ता, आकाश मणचेकर, मनीषा खणगावकर, विकी केरकर, रोहन शारबिद्रे, फ्रेन्सिना लूद्रिक आदी उपस्थित होते.
उपस्थित महिला एकूण ४६ होत्या. यांना मार्गदर्शन करतेवेळी, “आपण सेवाभावी वृत्तीने हे पवित्र कार्य करीत आहात, असेच कार्य सदैव चालू ठेवावे.” असे प्रतिपादन श्री. फाले सर यांनी केले.
