*रोजगार,आरोग्य,पर्यटन बाबत हेल्पलाईन दोडामार्ग ग्रुपने पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष*
मत्स आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची ओरस (सिंधुदुर्गनगरी ) येथे सदिच्छा भेट घेण्यात आली.त्यावेळी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी, तिलारी खोरे पर्यटन विकासमधून रोजगार निर्मिती यासाठी आपण पुढाकार घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा यासाठी दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप व भाजपा पदाधिकारी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली.
दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाची दयनीय परिस्थिती बद्दल चर्चा करण्यात आली.मंत्री राणे यांनी सकारात्मक आहोत,याबद्दल येत्या काही दिवसात बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा नक्की प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आहे.यावेळी वैभव इनामदार, सुधीर दळवी, आनंद तळणकर, संजय सातार्डेकर, देवेद्र शेटकर, पराषर सावंत, दीपक गवस उपस्थित होते.