*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाटात रिक्षा आणि कारचा भिषण अपघात*
*कणकवली : प्रतिनिधी*
फोंडाघाट मध्ये रिक्षा आणि ईनोव्हा कारचा भिषण अपघात झाला.कलमठ येथील श्री.चिंदरकर यांची रिक्षा आणि सांगली येथील श्री.तलवारे यांची ईनोव्हा या दोन वाहनांमध्ये हवेली नगर येथे हा अपघात झाला.या अपघातात ईनोव्हाची १ साईड कापली गेली असून रिक्षा पलटी होऊन घासत जाऊन गटारात पडली.
दरम्यान या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक फोंडाघाट वासीयांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेत मदत केली.अपघाताची भीषणता पाहता सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही.