फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न*

*फोंडाघाट :गणेश इस्वलकर*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये राष्ट्रीय मतदार दिन संपन्न झाला.२५  जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. महाविद्यालयातच्या एन.एस.एस. विभागामार्फत या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.प्रास्ताविका मध्ये बोलताना डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले की लोकशाहीचा कणा असलेली मतदान प्रक्रिया त्यात आपण मतदार झालो पाहिजे. बऱ्याच वेळा आपणास हे ज्ञात नसते की कसे मतदार व्हायचे त्यामुळे केंद्र सरकारने मतदान दिन सारखे प्रकल्प हाती घेतले आणि लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे.

आपल्या मनोगतात बी.एल.ओ.मनोज गव्हाणकर म्हणाले की वोटर हेल्पलाइन अॅप विषयी आपणास जागृती असणे आवश्यक आहे.जन्मतारीख योग्य असणे,नावाचे स्पेलिंग अचूक असणे आवश्यक आहे.आपणास एप्लीकेशन विषयी सर्व माहिती ॲपवरून येते.ती आपण नीट समजून घेणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे माहिती भरली तर आपणाला आणि आम्हालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि काम नीट होते असे प्रतिपादन केले.त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी अॅप विषयी संपूर्ण माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. राज ताडेराव म्हणाले की राष्ट्रीय मतदार दिनाचे फार महत्त्व आहे. लोकशाही प्रधान देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण मतदान झाल पाहिजे. आपण निर्भीड मतदार झालो तरच लोकशाही मजबूत होईल. असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रा. कीर्ती पाटील यांनी मांनले.कार्यक्रमाला महाविद्यालय सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!