नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार

नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार*

*मत्स्योद्योग,बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन*

*पुर्नवसन नवीन कुर्ली गावात विकासाचे रोल मॉडेल करणार ना. नितेश राणे*

*फोंडाघाट  : प्रतिनिधी*

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या सततच्या पाठपुराव्याने व विशेष प्रयत्नातुन नवीन कुर्ली गावाकरीता मंजुर झालेल्या रास्त धान्य दुकानाचे उद्घाटन राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ जानेवारी रोजी सायंकाळी पार पडले.

विस्थापित नवीन कुर्ली गावाचे पुर्नवसन होवुनही गेली कित्येक वर्षे नवीन कुर्ली गावातील ग्रामस्थांना आपल्या रास्त धान्य दुकानातील रेशनिग करीता जुन्या कुर्ली गावामध्ये पायपीट करावी लागत होती.वारंवार रेशनिग धान्य करीता जुन्या कुर्ली गावात जाणे प्रकल्पग्रस्तांना आर्थिक स्थितीत परवडनारे नव्हते.सदर बाब नवीन कुर्ली गावातील प्रकल्पस्तांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणां-या ग्रामविकास मंडळाच्या पदाधिका-यांनी कणकवली तहसिलदार, प्रांताधिकारी तसेच कणकवली माजी सभापती मनोज रावराणे व नामदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणुन दिले होते.

सदर मागणी माजी सभापती मनोज रावराणे यांच्या माध्यमातुन नामदार नितेश राणे यांसकडे असतेवेळी नामदार नितेश राणे यांनी संबंधित विभागाकडुन लवकरच आपण सदर काम पुर्ण करुन घेवु व उद्घाटनास आपण येवु अशी ग्वाही ग्रामविकास मंडळाच्या पदाधिका-यांना दिली होती काही दिवसापुर्वीची शासन स्तरावरील सर्व कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर नवीन कुर्ली गावाकरीता स्वतंत्र रास्त धान्य दुकानाची मंजुरी देण्यात आली व त्याचे उद्घाटन आज राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नामदार नितेश राणे यांनी सदर कामाच्या बाबतीत ग्रामविकास मंडळच्या सततच्या पाठपुराव्या बाबत कौतुक केले.कॅबिनेटची सभा आटपुन या कार्यक्रमांस उपस्थित राहिलो व उद्याच्या कॅबिनेटकरीता पुन्हा मुंबईला जानार हे फक्त येथील मतदारसंघातील जनतेच्या प्रेमापोटी आहे. आता तर तुम्हचा आमदार हा आता नामदार झाला असुन नवीन कुर्ली गावातील विकासाचे कुठलेही काम थांबणार नाही. संपुर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी पालकमंत्री म्हणुन आपण घेत आहोत. स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुर झाल्यानंतर इथुन पुढे माझ्याकडे येनारी सर्व कामे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन आपण प्राधान्य देवुन करु व पुर्नवसन नवीन कुर्ली गाव विकासाचे मॉडेल बनवु आता कसलीही चिंता करु नका अशी ग्वाही यावेळी दिली.

यावेळी नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांच्या हस्ते नामदार नितेश राणे यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रम स्थळी उपस्थित ग्रामस्थांन मध्ये उत्साह व समाधान दिसत होते. यावेळी प्रांताधिकारी जगदिश कातकर तहसिलदार दिक्षांत देशपांडे, भाजपचे राजन चिके, संतोष कानडे, दिलीप तळेकर, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अधक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे, सचिव धिरज हुंबे सर, सदस्य अमित दळवी, कृष्णा परब, अनंत चव्हाण ,सदाशिव राणे,अरुण पोवार, बाळकृष्ण चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राजेंद्र तेली, मधुकर परब,सत्यवान मेस्त्री, जनार्दन पोवार, सुभाष परब, अंकुश पवार, सदानंद पाटील,अरुण पाटील, मारुती पोवार,विजय राणे, भटजी काका, मंगेश चव्हाण, संदीप मेस्त्री, नारकर काका,विजय कोलते, मुन्ना जाधव,तुकाराम कामतेकर, प्रकाश आग्रे नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, उपाध्यक्ष मंगेश मडवी,सचिव अतुल डऊर,प्रशांत दळवी, अविनाश चव्हाण, सचिन साळसकर, विजय आग्रे, शिवाजी चव्हाण, सचिन परब, अनिल दळवी, महादेव ऐंडे, संजय मोहिते, भाग्येश पवार, मनीष सावंत, अमित डऊर, रोहित चव्हाण , सुरज शिंदे आदी ग्रामस्थ तथा योगिता मडवी, आरती पिळणकर, प्रिया दळवी ,नवीन कुर्ली पोलीस पाटील मृणाली चव्हाण,आदी महिला उपस्थित होते. कार्यक्रमास महिला वर्गाची उपस्थिती लाक्षणिक होती. यावेळी कार्यक्रम स्थळी व संपुर्ण नवीन कुर्ली गावात ठिकठिकाणी पालकमंत्री यांच्या स्वागतांचे बॅनर उपस्थिताचे लक्ष वेधुन घेत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धीरज हुंबे सर यांनी तर आभार अविनाश चव्हाण यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!