*कोंकण एक्सप्रेस*
*गोपुरी येथे दीपक बेलवलकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
कोकणगांधी प.पू.आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम या संस्थेमार्फत रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठिक ०७.४५ वाजता गोपुरी आश्रम कार्यालय येथे मा. दिपकभाई बेलवलकर अध्यक्ष-व्यापारी संघ कणकवली, यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर ,प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकरअध्यक्ष,श्री. विजय सावंत उपाध्यक्ष,श्री. अमोल भोगले खजिनदार,श्री.विनायक मेस्त्री सचिव आणि व्यवस्थापक मंडळ सदस्य व कर्मचारी वृंद उपस्थित होते.