श्रेयश शिंदे यांचा साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक

श्रेयश शिंदे यांचा साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक

*कोंकण एक्सप्रेस*

*श्रेयश शिंदे यांचा साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*कणकवली : प्रतिनिधी*

सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांचे वतीने ३ जानेवारी, २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल काल दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी घोषित करण्यात आला. राज्यभरातून या काव्यलेखन स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये कणकवली येथील श्रेयश अक्षया अरविंद शिंदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या काव्य लेखन स्पर्धेत श्रेयश शिंदे यांच्यासोबत प्रा.सरोज कोरे यांचा प्रथम, मिलिंद कांबेरे व डॉ. शुभांगी कुंभार यांचा द्वितीय तर रूपाली रणदिवे व संचित कांबळे यांचा तृतीय क्रमांक आला. रज्जाक शेख व प्रा. डॉ. आबासाहेब उमाप तसेच प्रा. नसरीन अन्सारी व प्रा. संजय वत्सला ईश्वर यांना अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक देण्यात आला. नवोदित कवयित्री प्रियांका भाटले व दिपीका बाचल यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातून या काव्यवाचन स्पर्धेत एकूण ३० कवींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. मंगला उनवणे, पत्रकार जयंत लंगडे व प्रा.डॉ.संजय सरगडे यांनी केले. यशस्वी स्पर्धकांचे साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड प्रा.आनंद साठे, कॉम्रेड जयंत उथळे, लेखक रोहित आवळे आदिनी हार्दिक अभिनंदन केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी होणार असून, विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, या सर्व कविंच्या प्रत्येकी दोन कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!