*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*कणकवली : प्रतिनिधी*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,श्री.तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी,बालमंदिर कनेडी प्रशालेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रजासताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन, करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत, संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली. माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगते सादरीकरण केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सन्मा. सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बालमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी व उच्च माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर आकर्षक नृत्य सादरीकरण केले. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर स्व- रचित कविता सादर केल्या. सरते शेवटी इयत्ता नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांच्या सांघिक रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन मा.श्री.आर.एच.सावंत, क.ग. शि.प्र.मंडळ मुंबईचे संचालक मा. श्री.व्ही.बी.सावंत, शालेय समिती सदस्य मा.श्री. गणपत सावंत, मा.श्री. चंद्रशेखर वाळके, मा.श्री. संतोष सावंत, मा.श्री. बावतीस घोन्सालवीस, मा. श्री. मंगेश सावंत, मा. श्री. सुनिल सावंत, मा. श्री. अरुण सावंत, सर्व संस्था पदाधिकारी व शालेय समिती सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.