*ओसरगाव तलावाच्या काठावर कणकवली तालुका बार असोसिएशन संघटनेचे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न*

*ओसरगाव तलावाच्या काठावर कणकवली तालुका बार असोसिएशन संघटनेचे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*ओसरगाव तलावाच्या काठावर कणकवली तालुका बार असोसिएशन संघटनेचे स्नेहसंमेलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न*

*ओसरगाव तलाव भविष्यात पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरणार- बबली राणे*

 *कणकवली  : प्रतिनिधी*

कणकवली तालुका बार असोशियन संघटनेचे स्नेहसंमेलन व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आज तलावाच्या काठावर संपन्न झाला त्या अगोदर 70 वकील व त्यांचे परिवार थोडीफार तलावाच्या काठावर साफसफाई केली व त्यानंतर तलावाच्या काठावर मनमुराद पणे निसर्गाचा आनंद सुरमई संगीताच्या कार्यक्रमाने संपन्न झाला. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे कणकवली वकील संघटनेने महामार्गावर जवळ असलेल्या तलावाच्या काठावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सहकुटुंब सहपरिवार मन मुराद निसर्गाचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला गावाच्या वतीने या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

तलाव काठ रंगीबेरंगी, सुमधूर स्वरांनी काठ आज न्हाऊन निघाला, आधी साफसफाई मोहीम करून स्वच्छता, अत्यंत शिस्तीने आनंद लुटून तलावावर निसर्गात रमून गेलेला वकील वर्ग आणि कुटुंबीय. ओसरगावचे महत्व आणि प्रसिद्धी व्हावी म्हणुन खास आयोजन केले होते .
  बबली राणे यांचे ऐतिहासिक उपोषण ग्रामस्थांसह झाले होते तसेच त्यांच्या मित्र परिवाराकडून तलावाच्या काठावर वीस बेंच बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे सर्वांना बैठक व्यवस्थेवर बसून जेवणाचा आस्वाद घेता आला  लवकरच सुशोभीकरण करण्याची कामे सुरू केली जाणार आहेत, ओसरगाव तलाव भविष्यातला हॉटस्पॉट पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!