शिवसेना कुडाळच्या वतीने स्वर्गिय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी

शिवसेना कुडाळच्या वतीने स्वर्गिय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना कुडाळच्या वतीने स्वर्गिय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी*

*नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा सत्कार*

*कुडाळ : प्रतिनिधी*

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,कार्यकर्ते यांच्या वतीने कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गिय दिघे साहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच कुडाळ शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या शुभ प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर,जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी,जिल्हा संघटक रुपेश पावसकर,कुडाळ नगरपंचायत गट नेते विलास कुडाळकर, नगरसेवक ॲड कुडाळकर, ॲड यशवर्धन राणे, तालुका प्रमुख अरविंद करलकर, योगेश तुळसकर, महीला तालुका प्रमुख सौ रचना नेरुरकर, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी सरपंच दादा साईल, माजी उप सरपंच दिलीप निचम,उप तालुका प्रमुख बाबी शिंदे, महीला उप तालुका प्रमुख सौ अनघा रांगणेकर, विभाग प्रमुख जयदीप तुळसकर, जेष्ठ शिवसैनिक रमेश घोगळे,सौ रेवती राणे,राजविर पाटील, प्रसन्ना गंगावणे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!