*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या श्रेया राठोड व चिन्मयी खानोलकर यांना जिल्हास्तरीय विद्यार्थी शौर्य पुरस्कार*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
संरक्षण मंत्रालय व शिक्षण विभाग, भारत सरकार व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा 4.0 या प्रकल्पांतर्गत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया प्रभाकर राठोड व इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी चिन्मयी जयसिंग खानोलकर यांना सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विद्यार्थी शौर्य पुरस्कार जाहीर झाला.
सशस्त्र दलातील अधिकारी यांच्या बलिदान आणि शौर्याच्या गौरव करण्यासाठी वीर गाथा 4.0 हा प्रकल्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये श्रेया राठोड हिच्या चित्राला जिल्हास्तरीय क्रमांक मिळाला, तर चिन्मयी जयसिंग खानोलकर हिच्या लेखाला जिल्हास्तरीय क्रमांक प्राप्त झाला.या पुरस्कारांचे वितरण प्रजासत्ताक दिनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग या ठिकाणी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या हस्ते करण्यात आले.या दोन्ही विद्यार्थिनींना आनंदा बामणीकर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व स्तरातून दोघांचंही अभिनंदन होत आहे.