*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने सागरी पोलीस अंतर्गत (मनुष्य/निर्मनुष्य) असलेल्या बेटांवर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
मा.केंद्रीय गृह मंत्रालय,दिल्ली यांचेकडुन (मनुष्य/निर्मनुष्य) बेंटावर दि. 26.01.2025 रोजी ध्वजारोहण करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते.त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने सागरी पोलीस अंतर्गत असलेल्या एकूण सहा सागरी बेटांवर ध्वजारोहण कार्यक्रम दिमाखात पार पाडण्यात आले.
ध्वजारोहणासाठी बेटावर जाणेकरीता पोलीस स्पीड बोटी अस्मिता, नेपोलियन, भद्रकाली व खाजगी मच्छिमार बोंटी व ट्रॉलरचा वापर करण्यात आलेला आहे.सदरचे ध्वजारोहण कार्यक्रम अनुक्रमे सिंधुदुर्ग किल्ला येथे श्री.भरत धुमाळ,पोलीस निरीक्षक,सागर सुरक्षा विभाग, सिंधुदुर्ग यांनी केले.निवती रॉक येथे सहा.पोलीस निरीक्षक, श्री.भिमसेन गायकवाड,निवती पोलीस ठाणे,जॉन्स्टोन कॅसल रॉक येथे पोलीस उपनिरीक्षक श्री. रामजीलाल पटले, पद्यमगड रॉक येथे श्री. प्रविण कोल्हे, पोलीस निरीक्षक, मालवण पोलीस ठाणे, कवडा रॉक येथे पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे व घंगाळ बेट येथल ध्वजारोहण श्री. संदिप भोसले, पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला पोलीस ठाणे यांचे हस्ते करण्यात आले. सदर सर्व ध्वजारोहण कार्यक्रमांचे ड्रोन कॅमे-याद्वारे उत्कृष्टरित्या शुटींग करण्यात आलेले आहे.
सदरचे ध्वजारोहण श्री.सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व श्री. कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे सुचनेप्रमाणे श्री. भरत धुमाळ, पोलीस निरीक्षक, सागर सुरक्षा विभाग, श्री. प्रविण कोल्हे, पोलीस निरीक्षक, मालवण, श्री. संदिप भोसले, पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला व सहा. पोलीस निरीक्षक, श्री. भिमसेन गायकवाड, निवती पोलीस ठाणे यांनी केलेले असुन ध्वजारोहणासाठी बंदर विभागाचे अधिकारी, मत्सविभाग अधिकारी, संरपच, मंडळ अधिकारी, तलाठी, दिपगृह विभागाचे अधिकारी, कस्टम विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस विभागाचे अंमलदार व स्थानिक ग्रामस्थांनी उत्साहाने उपस्थिती दर्शविली.