*कोंकण एक्सप्रेस*
*आम.किरण सामंतांनी बडेजाव न करता मतदारांसोबत उभं राहून केला ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा*
*आमदार किरण सामंत यांनी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा*
*लांजा : प्रतिनिधी*
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.लांजा येथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवामध्ये आमदार किरण सामंत यांचा साधेपणा नव्याने पहायला मिळाला.लांजा तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणामध्ये तहसीलदार प्रियांका ढोले यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी हजेरी लावली होती.
येथील अधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांना ध्वजारोहणाजवळ आणण्यासाठी विनंती केली मात्र त्यांनी कोणताही बडे जाव न करता माझ्या मतदारांसमवेत मी उभा राहून हा कार्यक्रम साजरा करीन असे सांगितले. त्यामुळे लांजा वासियांनी आमदार किरण सामंत यांचा साधेपणाचे दर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
मी तालुक्याचा आमदार आहे म्हणून माझ्या पद्धतीने कार्यक्रम हवा असा कोणताही पद्धतीचा बडा जाऊ नका आमदार किरण सामंत यांनी साधेपणाने आजचा हा उत्सव येथील मतदारांसमवेत लहान विद्यार्थ्यांचा समावेश आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला.
आज लांजा आणि राजापूर तालुक्यामधील प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगळेपणा पाहायला मिळाला लांजा राजापूर मतदारसंघांमध्ये इतिहासात नोंद होईल असा कार्यक्रम येथील जनतेला आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेतून पाहायला मिळाला.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांचा ,एनसीसी चा विविध विद्यार्थ्यांचा परेड कार्यक्रम आज लांजा आणि राजापूर वासियांना अनुभवायला मिळाला. त्याच पद्धतीने विविध वेशभूषा करून सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद लांजा तसेच राजापूर तालुक्यातील राजापूरवासी यांनी घेतला आमदार किरण सामंत यांच्या डोक्यातून आलेली सुपक कल्पना ग्रामीण भागातील तालुक्याच्या ठिकाणी पाहायला मिळाली येथील जनतेने या उपक्रमाचे स्वागत केले.