*कोकण एक्सप्रेस*
*पिकुळे येथील शेळपीवाडी हनुमान मंदीर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा*
*दोडामार्ग : शुभम गवस*
पिकुळे शेळपीवाडी हनुमान मंदीर येथील काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक,जिल्हा कार्यकारणी सदस्य अंकुश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.शनिवारी श्री.देव मारुती देवस्थानचा वार्षिक नाट्य उत्सव आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधितून मंजूर झालेला सभा मंडप चे लोकार्पण करण्यात आले.या अगोदरच्या सभा मंडप वर वडाचे झाड पडून सभामंडपाचे मोठे नुकसान झाले होते. नव्याने सभा मंडप होण्यासाठी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला होता,ग्रा.पंचायतीकडून देखील आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केल्याने या मंडपचे काम वेळेत पूर्ण झाले,शनिवारी या मंडपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य गवस यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी लोकप्रिय राजा उदय कोनसकर यांचा सत्कार लोकप्रियतेच्या उच्चत्तम शिखरावर असलेले लोकप्रिय दशावतार राजा उदय राणे कोनसकर यांचा तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर ग्रा.पं.शंकर गवस,रत्नदीप गवस,सिध्दीविनायक नाट्य मंडळ मालक शत्रु गवस,संतोष नाईक,ॲड.प्रविण नाईक ,लक्ष्मण नाईक, सदाशिव नाईक,महेंद्र नाईक,दीपक नाईक,आनंद नाईक, वामन नाईक,सुनिल नाईक आदी उपस्थित होते.