छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ फोंडाघाटच्या वतीने कणकवलीतील सिने कलाकारांचा भव्य दिव्य सत्कार

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ फोंडाघाटच्या वतीने कणकवलीतील सिने कलाकारांचा भव्य दिव्य सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ फोंडाघाटच्या वतीने कणकवलीतील सिने कलाकारांचा भव्य दिव्य सत्कार*

*कणकवली : प्रतिनिधी*

फोंडा घाट बिजली नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाला काल 26 जानेवारी रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.मागील पन्नास वर्षे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आयोजक दरवर्षी उत्तम कार्यक्रम करत आहेत .ह्या वर्षी सुद्धा विविध ठिकाणच्या १३ ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी चित्रपट व मालिका मधून अभिनय करणारे कणकवली तील कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ अभिनेते अभय खडपकार,अभिनेत्री अक्षता कांबळी,संजय मालंडकर,रविकिरण शिरवलकर,निलेश पवार,शेखर गवस,चंद्रशेखर कल्याणकर,सत्यवान गावकर व मोठ्या संख्येने फोंडा ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अभिनेते खडपकर ,संजय मालंडकर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी नवीन पिढीसाठी मालवणी भाषेतून मनोगत व्यक्त करत उपस्थित सर्वांनी मने जिंकली.यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सौ कांबळी यांचे भरभरून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!