*कोंकण एक्सप्रेस*
*तोंडवली येथे २६ जानेवारीला अक्षरोत्सव संग्रहाचे संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत आमच्या आगळ्यावेगळ्या “#अक्षरोत्सव” या संग्रहाचे प्रदर्शन तोंडवली (तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानगरी मधील विविध शैक्षणिक विभागांच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांसह सर्वांनीच या संग्रहाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी #चंद्रकांत_लाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत,सचिव निखिल सावंत,पोर्टट्रस्ट मधील सेवानिवृत्त अधिकारी दिगंबर राणे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक यल्लाप्पा गुंडू दड्डीकर, सेवानिवृत्त पोलिस उमहानिरीक्षक बाळासाहेब गिरी,माझगाव डॉक चे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप गवळी,मुंबई येथील व्यावसायिक सुरेश आदाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट चे सेवानिवृत्त अधिकारी बाळकृष्ण जाधव,विनायक चव्हाण,फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.तुकाराम केदार यांच्यासह सर्व प्राचार्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.यावेळी डी.फार्मसी,बी. फार्मसी,बी.एस्सी. नर्सिंग,आर.ए.एन.एम.नर्सिंग आणि कृषी महाविद्यालयाच्या असंख्य विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन उत्सुकतेने पाहिले.
याचवेळी कणकवली येथील गुरुकृपा हॉस्पिटलच्या डॉ.प्रवीण बिरमोळे, रत्नागिरी येथील शासकीय फार्मसी कॉलेजचे फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. एच. एन. गुप्ता, रत्नागिरी येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. डॉ. ए. एस. सावली यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न विचारून या संग्रहाबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेतली.