वेंगुर्ले येथे दुसऱ्या अखिल भारतीय दशावतार नाट्य संमेलनाचे आयोजन

वेंगुर्ले येथे दुसऱ्या अखिल भारतीय दशावतार नाट्य संमेलनाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले येथे दुसऱ्या अखिल भारतीय दशावतार नाट्य संमेलनाचे आयोजन*

*दशावतार संशोधक डॉ.अशोक भाईडकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी वर्णी*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

दशावतार याच लाल मातीची समृद्ध लोककला असून आज हिच लोककला उपेक्षित आहे.तिला शासन दरबारी मान मिळावा, दशावतार कलावंताची दखल शासन दरबारी घेतली जावी यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.पहिलं अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन हे वेंगुर्ले येथे गेल्या वर्षी मोठ्या थाटात संपन्न झाले होते.अनेक मान्यवरानी या संमेलनात हजेरी लावली होती.विविध परिसंवादाचे आयोजन गेल्या वर्षी करण्यात आले होते.त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होता.त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला होता.

या वर्षी अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन दि ०८ आणि ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले असून शनिवारी ग्रंथ दिंडी ने संमेलनाची सुरुवात होईल आणि रविवार दि ०९ फेब्रुवारीला सिद्धिविनायक मंगल कार्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाची सुरुवात फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती श्रीधर शेवडे हिच्या भरतनाट्यम नृत्याने होईल.

या संमेलनात दशावतार बाज गायन स्पर्धा होणार असून ही स्पर्धा खुल्या गटासाठी असून या स्पर्धेसाठी फक्त २० स्पर्धकांना अंतिम सादरीकरणासाठी १०० रूपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश दिला जाईल.सहभागी होऊ इच्छित असतील अशा स्पर्धकांनी दोन मिनिटांचा व्हिडिओ प्रा.डॉ.सचिन परूळकर यांच्या ९४२१२३८०५३ व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे.या स्पर्धकामधून केवळ २० स्पर्धेक निवडले जातील व या संमेलनात त्यांना सादरीकरण करण्याची संधी दिली जाईल व यातून अंतिम पाच क्रमांक काढले जातील.

तर शालेय गटासाठी लंगार नृत्य आणि दशावतार अभिनय या स्पर्धेचे आयोजन केले असून या गटासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू नसेल.अभिनय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपला दोन मिनिटाचा व्हिडिओ वरील व्हॉट्स ॲप वर पाठवावा. अभिनय स्पर्धेत फक्त २० जणांना प्रवेश दिला जाईल.सदर तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय,तृतीय,उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख पारितोषिक ₹ ११००, ₹ ७००, ₹ ५००, ₹ २५०,₹ २५० आणि प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येईल.

सदर संमेलनात खानोली गावचे सुपुत्र लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला :दशावतार’ या बहुचर्चित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.त्यानंतर जेष्ठ आणि लौकिक प्राप्त कलावंतांचा संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग या संमेलनात सादर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!