*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट येथे भव्य राज्यस्तरीय ग्रुपडान्स स्पर्धेचे आयोजन*
*२६ जानेवारीला श्री सत्यनारायण महापूजा*
*कणकवली : प्रतिनिधी*
प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तरूण मित्र मंडळ बिजलीनगर,मु.पो.फोंडाघाट,ता.कणकवली,जि.सिंधुदुर्ग.आयोजित वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने रविवार दि.२६ जानेवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली असून या निमित्त विविध कार्यक्रमांचही आयोजन केले आहे.
सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत आरोग्य शिबिर,दुपारी १.०० वा.आरती व महाप्रसाद,सायं. ४.०० वा. हळदी -कुंकू समारंभ,रात्री ७.०० वा.सुस्वर भजने,रात्री ९.०० वा. भव्य राज्यस्तरीय गुपडान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्वानी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रुपडान्स स्पर्धेतील सहभागी संघ पुढीलप्रमाणे -१. एजे.लील स्टार, भिवंडी,मुंबई २.एम.जे.ग्रुप, सावंतवाडी ३.क्रेझी ग्रुप,गोवा ४.सिद्धांत कलामंच,लांजा ५.फनी डान्स क्रिएशन ग्रुप,कुडाळ ६.स्टेपर्स ग्रुप,चिपळूण ७.संस्कृती कलामंच,फोंडाघाट ८.कलासार्थ ग्रुप,रत्नागिरी ९.डान्स होर्ड ग्रुप,गोवा १०.एस.के.ग्रुप,कणकवली ११.एंजल्स ग्रुप,पुणे १२.आर.डी.एक्स.ग्रुप,सावंतवाडी,१३. विश्वरुपम कलामंच,रायगड.