*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हाप्रमुख पदाच्या ऑफर्स सह प्रदीप उर्फ बंड्या साळवी आज शिंदे शिवसेनेत शेकडो कार्यकर्ते,पदाधिकारी याच्या सह प्रवेश करणार*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
बंड्या साळवी यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद सभापती,सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सरपंच,शाखाप्रमुख यांच्या सह शेकडो लोक आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेतयामध्ये महेंद्र झापडेकर, देवयानी झापडेकर माजी जि. प. सभापती, राकेश उर्फ राकु साळवी, संदीप सुर्वे, प्रशांत सुर्वे, घाणेकर, तांबे, अनुष्का खेडेकर, अभय खेडेकर, याच्यासह शेकडो लोक आज प्रवेश करणार आहेत.
दरम्यान बंड्या साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख होते. त्यांनी नुकतेच चार दिवसापूर्वी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे सुपूर्त केला होता.त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात जाणार हे नक्की झाले होते. आता पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेने मध्ये प्रवेश करणार आहेतदरम्यान तालुकाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत काम करणारे बंड्या साळवी आता शिंदे गटाच्या शिवसेनेत जिल्हाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
दरम्यान तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या पाठोपाठ आता सगळेच तालुक्यातले पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.तसेच माजी आमदार राजन साळवी हे कोणत्याही परिस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे ठामपणे सांगण्यात आले आहे. तसेच वेळ पडल्यास ते भाजपमध्ये जातील पण शिंदे शिवसेनेत जाणार नाहीत अगदी त्याचप्रमाणे त्यांनी शिवसेना पक्षातून आपल्या सदस्य पदाचा राजीनामा न दिल्याने ते अद्यापही शिवसेने पक्षातच असल्याचे सांगितले जाते
दरम्यान आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी आमदार जिल्ह्यातील गणपतराव कदम,सुभाष बने तसेच माजी जिल्हाप्रमुख यांचाही यावेळी प्रवेश होणार असल्याचे छोटेखानी कार्यक्रमात समजते.