*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इयत्ता दहावीतील विद्यार्थांना परिक्षेला सामोरे जाताना व कॉपीमुक्त अभियान जागृती मार्गदर्शन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील इयत्ता दहावीच्या दोन शे विद्यार्थांना फेब्रुवारी / मार्च २०२५ च्या बोर्डाच्या वार्षिक परिक्षेला सामोरे जातांना अभ्यासक्रमाला असलेल्या सर्व विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले वार्षिक परीक्षा ही तणावमुक्त व भयमुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना माणसिक तयारी कोणती करावी यांचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच परिक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांच्या मनातील प्रत्येक विषयांची भिती काढून टाकण्यासाठी काय केले पाहिजे याचेही मार्गदर्शन केले आदर्श उत्तर पत्रिका होलोक्रॉप्ट स्टिकर ‘ बारकोड स्टिकर यांची माहिती दिली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी मराठी प्रथम भाषा या विषयांचे मार्गदर्शन केले कृतिपत्रिका सोडवताना कोणती काळजी घ्यावी या विषयी माहिती कथन केली विद्यार्थांच्या मनातील गोंधळ काढून टाकण्यात आला . इंग्रजी विषयांचे मार्गदर्शन श्री विलास ठाकूर सर यांनी केले काठीण्यपातळी असलेला इंग्लिश विषय ठाकूर सरांनी आपल्या सुगम मार्गदर्शनाने सोपा केला विद्यार्थांना आत्मविश्वास निर्माण करून परि क्षेची भिती दूर केली . भूगोल विषयांचे मार्गदर्शन श्री अच्यूतराव वणवे सरांनी केले भूगोलाची आदर्श उत्तर पत्रिका कशी लिहावी तसेच विद्यार्थी कोणत्या चुका करतात तसेच नकाशा वाचन आणि नकाशा भरणे कसे करावे याचेही मार्गदर्शन केले इतिहास विषयाचे मार्गदर्शन श्री संदिप कदम सरांनी केले कदम सर बोर्डाचे सीएम आहेत आपल्या प्रदिर्घ अनुभवातून इतिहास विषयांचे सुगमपणा सोपा करून मार्गदर्शन केले . विज्ञान विषयांचे मार्गदर्शन श्री पृथ्वीराज बर्डे सरांनी केले . विज्ञानातील क्लिष्टपणा काढून सहज सोप्या पद्धतीने विज्ञानाचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले . गणित विषयाचे सुगम मार्गदर्शन श्री . खरात सरांनी केले गणित विषयांची प्रश्न पत्रिका व गणित सोडविता कोणती काळजी घ्यावी सराव कसा करावा याचेही मार्गदर्शन केले . आभार वर्गशिक्षिका सौ हरमलकर मॅडम यांनी मानले यावेळी सर्वशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.