*कोंकण एक्सप्रेस*
*वायंगणी येथे २६ जानेवारीला ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी – वेंगुर्ला यांच्या वतीने प्राथमिक केंद्र शाळा सुरंगपाणी वांयगणी तळेकरवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त १०० रक्तदात्यांचे रक्तदान करून घेण्याचा मानस आहे.
या शिबिरात रक्तदात्यांना टी-शर्ट आणि महिलांसाठी गृह उपयोगी भेटवस्तू व सन्मानपत्र भेट म्हणून देण्यात येणार आहे.तरी रक्तदान शिबिराच्या या विधायक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन आपले नातेवाईक हितचिंतक यांनाही सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन हेल्प ग्रुप फाउंडेशन वायंगणी अध्यक्ष सुमन कामत यांच्या वतीने करण्यात येत आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी आपली नावे सुमन कामत ९४२१२३५११७,हर्षद साळगावकर ९६०७२१३०१६,प्रवीण राजापूरकर ९४२०७४००७४,सुनील नाईक ९४२१२६७८३२ येथे संपर्क करून नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे.