*कोंकण एक्सप्रेस*
*पुनर्वसन साळ येथील सुपूत्राची प्रजासत्ताक दिनी ‘परेड’ साठी निवड*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
आजोबाच्या पावलांवार पाऊल ठेवून महेश सावंत याची सैन्यात भरती होण्याच्या दिशेने वाटचाल तिराळी धरणामुळे विस्थापित झालेल्या पालं गावातील सुरेश सावंत है भारतीय लष्करातील निवृत सुभेदार, त्याचा नातू महेश नवनाथ सावंत हा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या तो पुणे येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे.
त्या ठिकाणी तो एन सी सी या विषयातही लष्कर भरती आगोदरचे प्राथमिक शिक्षण घेत आहे. त्यातूनच त्याची २०२५ सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली आहे. कु. महेश सावत पाने यासाठी अथक परिश्रम घेतले तसेच त्याच्या वरिष्ठाचेही त्याला योग्य मार्गदर्शन लाभले आहे. तो २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील परेड कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पाबद्दल त्याचे सावंत कुटुंबिय, तसेच त्याचे कॉलेज, मित्र परिवार, सामाजिक राजकीय क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.

