*कोंकण एक्सप्रेस*
*जल शक्ति मंत्रालय तर्फे म्हापण येथील सुजाता गोसावी यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यास दिल्ली येथे विशेष निमंत्रण*
*कुडाळ : प्रतिनिधी*
बचत गटाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल म्हापण गोसावीवाडी येथील सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ति मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सोहळ्या करिता विशेष निमंत्रित करण्यात आले.म्हापण गावाला सुजाता गोसावी यांच्या मुळे मिळालेल्या बहुमानाने गावाचे नाव देश पातळीवर पोहोचले असून संपूर्ण म्हापण गावाला त्यांचा अभिमान असून त्यांचा ग्रापंचायत म्हापणच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी म्हापण ग्रापंचायत सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, ग्रामपंचायत अधिकारी तुषार हळदणकर,माजी पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम परब, ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, सदस्य गुरुप्रसाद चव्हाण, सदस्या सुषमा म्हापणकर ,अमृनाथ बचत गट च्या सुनयना गोसावी, संगिता गोसावी,सेजल गोसावी, अन्य बचत गट पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी दाजी जुवाटकर, सावळाराम म्हापणकर,श्रीमती सकरे ,ग्रामस्थ उपस्थित होते.
सुजाता बाळकृष्ण गोसावी यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून जलमिशन अंतर्गत गावातील नळपाणी योजना चालविण्यास घेतली आहे. या योजनेचे पाणी सोडणे, पाईपलाईन दुरुस्ती, नळ जोडणी, पाणी पट्टी वसुली आधी कामे त्या बचत गटाच्या माध्यमातून करतात यामुळे बचत गटाला आर्थिक फायदा झाला आहे याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण गोसावी वाडी येथील रहिवासी सुजाता गोसावी व त्यांचे पती बाळकृष्ण सिताराम गोसावी यांना दिनांक २३ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्या करिता विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.


