वैभववाडी तालुक्यात नितेश राणेंना जोरदार धक्का

वैभववाडी तालुक्यात नितेश राणेंना जोरदार धक्का

*कोकण Express*

*वैभववाडी तालुक्यात नितेश राणेंना जोरदार धक्का…..!!*

*उंबर्डे मेहबूबनगर मधील राणेसमर्थ , भाजपाच्या 150 ते 200 कार्यकर्त्यांचा जिल्हा बँक अध्यक्ष तथा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते श्री. सतीश सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश…..*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन, श्री. जावेदभाई पाटणकर, श्री.गौसभाई पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . हा पक्ष प्रवेश घडवुन आणण्यासाठी युवासेनेचे जिल्ह्याचीटणीस श्री.स्वप्नील धुरी यांनी विशेष प्रयत्न करून नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उंबर्डे मेहबूबनगर याठिकाणी राजकीय सुरुंग लावला. यावेळी बोलताना सतीश सावंत यांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले . उंबर्डे मेहबूबनगर येथील मुस्लिम समाजातील लोकांनी ज्या विश्वासाने शिवसेनेत प्रवेश केलाय त्याला कुठंही तडा जाऊ देणार नाही , तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तसेच विकास कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असा विश्वास या वेळी दिला. इथून पुढे कोणत्याही प्रकारचा दबाव तथा धमक्या यांना भीक घालू नका,माझ्या सहित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.यावेळी सावंत यांच्या सोबत उपजिल्हाप्रमुख श्री.नंदू शिंदे, तालुका प्रमुख- मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस – स्वप्नील धुरी,माजी सभापती- रमेश तावडे, उपतालुका प्रमुख- सुरेश पांचाळ, माजी नगराध्यक्ष- राजेंद्र रावराणे,संजय चव्हाण, नगरसेवक-संतोष पवार,गजोबार, बंडू सावंत, विठोजी पाटील,जितेंद्र तळेकर, यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!