कुडाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी विजयानंतर शिवसेना शाखेत दिली भेट

कुडाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी विजयानंतर शिवसेना शाखेत दिली भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी विजयानंतर शिवसेना शाखेत दिली भेट*

*जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी केले अभिनंदन*

कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ नगरपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या उमेदवार सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणी उपनेते संजय आग्रे महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी कुडाळच्या शिवसेना शाखेत सौ. शिरवलकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर माजी नगरसेवक दीपक पाटकर विलास कुडाळकर राकेश कांदे, दीपक नारकर , दीपलक्ष्मी पडते, आबा धडाम, विनायक राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!