*शिक्षक भारती कणकवली शाखेच्या वतीने पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा तळेरे येथे संपन्न*

*शिक्षक भारती कणकवली शाखेच्या वतीने पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा तळेरे येथे संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिक्षक भारती कणकवली शाखेच्या वतीने पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा तळेरे येथे संपन्न*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

शिक्षक भारती कणकवली शाखेच्या वतीने इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा तळेरे केंद्र येथे संपन्न झाली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य राजू पिसे, केंद्रप्रमुख अँड.संजय पवार, केंद्र मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, मुख्याध्यापक सत्यवान केसरकर, प्रभाग मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, कणकवली तालुका अध्यक्ष श्रीराम विभूते, उपाध्यक्ष गुरुप्रसाद पाटील, केंद्र मुख्याध्यापक अनंत तांबे, संदीप ब्रह्मदंडे, जाकीर शेख, ज्ञानेश्वर सोनटक्के, मनोहर मराठे आदी उपस्थित होते.
या परिक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून ज्ञानेश्वर सोनटक्के व मनोहर मराठे यांनी काम पाहिले. परीक्षेसाठी केंद्र प्रमुख अँड.संजय पवार यांनी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार श्रीराम विभूते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!