*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधू रत्न फाउंडेशन महाराष्ट्राच्या अध्यक्षाअभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपारी बाग सुपर बाजार येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न*🌹
*कणकवली : प्रतिनिधी*
सुपारी बाजार मद्यवर्ती सह. ग्राहक संघ मर्या. सुपरबाजार ,कणकवली (एस एम हायस्कुल समोर) येथे अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदीकुंकू समारंभ आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला .यावेळी सुपरबाजारच्या कर्मचारी सौ सानिका सावंत यांच्या हस्ते सौ कांबळी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ,तसेच हळदीकुंकू वाण ही देण्यात आले ,यावेळी कर्मचारी सौ सानिका सावंत ,जान्हवी गुरव ,मधुरा चव्हाण,प्रिया वाळवे ,पूजा मोरे,सौ मिलन पाटील ,नीता भडंगे,मिलन कदम,तन्वी घाडी,मीना हले,उपस्थित होत्या ,यावेळी सुपरबाजार संस्थेचे कणकवली व्यवस्थापक श्री राजन अनंत सावंत ,सुपरवायझर संदीप कदम,तुषार घाडी ,आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांना उत्तम मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कणकवली शाखा व्यवस्थापक श्री राजन सावंत यांनी सौ कांबळी यांच्या कलेचं कौतुक करत आपल्या सुपरबाजार चे नित्याचे ग्राहक म्हणून भरभरून शुभेच्छा दिल्या 🌹🌹