कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आता दलालांचे बनले

कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आता दलालांचे बनले

*कोकण Express*

*कणकवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आता दलालांचे बनले…*

*परशुराम उपरकरांचा आरोप; अन्यथा कोण-कोणाशी, किती वेळा बोलले, ते जनतेसमोर ठेवू*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आता दलालांचे आणि ठेकेदारांचे कार्यालय बनले आहे,असा आरोप मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.दरम्यान पूर्वी जे शिवसेनेच्या विरोधात होते तेच आता शिवसेनेत राहुन केवळ ठेकेदारी करीत आहेत.आणि त्यांना शिवसेनेचे नेते ठेका घेण्यासाठी मदत करीत आहेत.जोपर्यंत शिवसेनेची सत्ता आहे.तोपर्यंत ते पक्षात असतील आणि त्यानंतर अन्य ठिकाणी जातील,असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. श्री.उपरकर यांनी याठिकाणी पत्रकार परिषद घेतली.यावेळी उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले,विरोधकांनी केव्हाच माझ्याकडे विकास कामा बाबत निवेदने दिली नाहीत.हे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगत असताना जुन्या शिवसैनिकानी विकास कामे देऊनही कामे होत नाहीत. म्हणून शिवसैनिकांनीच नाव ठेवलेल्या दलाल भवना मधील बैठकीत सर्वांनी जाब विचारत सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला. दलाल भवनात जो प्रकार झाला तो सारा प्रकार माझ्यापर्यंत जुन्या निष्ठावान शिवसैनिकांनी पोचवला. २००५ मध्ये जे आमच्यावर शिंतोडे उडवत होते, दगड मारत होते, तेच आज या दलाल भवनाचे मालक व सदस्य झाले आहेत. व ते या दलाल भवन मध्ये बसून कामे वाटप करण्याचे काम करतात. पण २००५ चा जुना शिवसैनिक अडगळीत पडल्याची व्यथा काही जुन्या शिवसैनिकांनी माझ्याकडे मांडल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच संबंधित मोबाईल कंपनी कडून या संदर्भातील तीन ते चार लोकांचे कॉल डिटेल्स मिळवले जातील. व कोण कोणाशी किती वेळा बोलले ते जनतेसमोर ठेवू, असा इशारा श्री उपरकर यांनी दिला. डीपीडीसीचे अध्यक्ष पालकमंत्री असताना सभा मात्र भाजपच्या खासदारांनी चालवली,असे ते म्हणाले.
उपरकर म्हणाले, आता जे शिवसेनेत ठेकेदार आले, त्यावेळी यातील काही समर्थक होते. तेथील सत्ता गेली म्हणून ते आता शिवसेनेत आले. पुन्हा सत्ता गेल्यास ते आणि कुठेतरी जातील अशी व्यथाही काही शिवसैनिकांनी माझ्याकडे मांडली असे श्री. उपरकर म्हणाले. तसेच हेच ठेकेदार जेव्हा समर्थक होते त्यावेळी त्यांना आम्ही शिवसेनेत असताना ठेकेदारांची गॅंग म्हणत होतो. मात्र आता शिवसेनाच ठेकेदारांची गॅंग झाल्याचा आरोप उपरकर यांनी केला. तिथे बसून जे व्यवहार चालतात त्यामुळेच निष्ठावंत शिवसैनिकांची एक शाखा व ठेकेदारांची एक शाखा कार्यरत झाल्याचा आरोपही श्री उपरकर यांनी केला. ज्या जुन्या शिवसैनिकांची कामे डावलण्यात आली व ते राजीनामा देण्याची भाषा करतात त्यांची विकास कामे घेऊन त्यांचे समाधान करावे असा सल्ला श्री उपरकर यांनी दिला. पालकमंत्र्यांना जर विकासकामांची निवेदने हवे असतील तर आज या माध्यमातून मी त्यांना सुचवितो की जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करा, आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पदे, डॉक्टर भरा अशीही मागणी उपरकर यांनी केली. पालकमंत्र्यांवर हे आरोप का होत आहेत याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे. कारण डीपीडीसी ची मिटिंग आतापर्यंत अध्यक्ष म्हणून पालकमंत्री चालवतात हे आम्हाला माहित होते.पण नुकतीच झालेली डीपीडीसी ची मिटिंग भाजपच्या खासदारांनी चालवली अशी निष्ठावंत शिवसैनिकांची भावना झाली. सत्ताधारी शिवसेनेच्या तालुका प्रमुख विषय मांडण्यासाठी उभे राहताच भाजपच्या खासदारांनी त्यांना खाली बसवले. ही पूर्ण सभा भाजपाचे खासदार हाताळत होते. अशी टीका श्री उपरकर यांनी केली. पालकमंत्र्यांनी कुणाचेही डंपर सोडले नसल्याचा दावा केला मात्र जर त्यांना खात्रीच करायची असेल तर फोंडाघाट पोलिस चेक पोस्ट वर जे सीसीटीव्ही बसवले आहेत त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व पालक मंत्र्यांनी हे डिटेल्स घेतले नाहीत तर 19 व 20 तारखेचे डिटेल्स आम्हाला घ्यावे लागतील असा इशारा श्री उपरकर यांनी दिला. सिलिका वाळू प्रश्नी कारवाई बाबत पत्र दिल्याचे पालकमंत्री सांगत आहेत. मात्र त्यांच्या पत्रावर तारीखच उल्लेख नाही. त्यामुळे हे पत्र केव्हा दिले हा संशोधनाचा भाग आहे असाही टोला उपरकर यांनी लगावला. 2005 च्या शिवसैनिकांचे आजही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच या शिवसैनिकांची व्यथा ऐकून घेण्यासाठी कुणी तयार नसल्याने माझ्याजवळ ते व्यथा मांडतात. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सत्ताधारी आमदार भाजपच्या खासदारांच्या कानात बोलले. त्याबाबतही शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. हेच आमदार निवडून येण्यापूर्वी तुम्ही फक्त लढ म्हणा असे सांगत असताना, आता सत्ता असून देखील भाजपच्या खासदारांच्या कानात सांगण्याची पाळी का आली? की पालकमंत्री ऐकत नाहीत म्हणून भाजपा खासदारांच्या कानात सांगण्यात आले. असाही सवाल उपरकर यांनी केला. 2005 मधील ज्या शिवसैनिकांना जे समर्थक मारायला पुढे होते तेच समर्थक आज शिवसेनेत ठेकेदार म्हणून आले. तेच कोट्यावधीची कामे करतात. उद्या शिवसेनेची सत्ता गेली की ते पुन्हा दुसरीकडे जातील.या सार्‍यात 2005 चा शिवसैनिक अडगळीत पडल्याचा टोला उपरकर यांनी लगावला. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये विरोधी पक्षाचे आमदार व खासदार यांची कामे मोठ्या प्रमाणात घेतली गेली. जुन्या शिवसैनिकांची कामे डावलले जातात. सत्ताधारी खासदार विनायक राऊत यांनी झालेल्या कामांची पत्रे देत एका गावात दीड कोटीचा निधी दिला. त्यामुळे खासदारांनी कलमठ गाव दत्तक घेतले आहे का? असाही सवाल उपरकर यांनी केला. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांचे पत्र हे नेमके टक्केवारीसाठी कुणाच्या विकासासाठी असा सवाल उपरकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!