कोंकण एक्सप्रेस
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा १०० % निकाल
कणकवली : प्रतिनिधी
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा 100% निकाल
विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेत सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात एलिमेंटरी चित्रकला परीक्षेसाठी 18 विद्यार्थी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेसाठी 13 विद्यार्थी बसलेले होते. ही परीक्षा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या केंद्रावर घेण्यात आली होती. एलिमेंटरी या परीक्षेत जान्हवी प्रदिप दळवी तपस्या महेश दळवी,अनुश्री विराज डोंगरे , प्रीती तुकाराम खानविलकर , श्वेता संदिप खानविलकर ,मृणल विठठल लाड , जागृती नरेश मेस्त्री ,तनिष्का तुकाराम परब, रिया नारायण राणे , सिध्देश सुर्यकांत चव्हाण ,मेहूल गजानन दळवी,आयुष भिकाजी घाडी, आर्यन अजय मडव, गौरव जयगणेश परब ,जयदीप विनोद रासम , जयेश दाजी रासम, सुजित सुहास रासम, साक्षात समीर सावंत असे एकूण 18 विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी पास होऊन एलिमेंटरी चित्रकला परीक्षेचा 100% निकाल लागला आहे.व इंटरमिजिएट या परीक्षेत गौरी प्रशांत घाडीगावकर , आदिती सुभाष रासम , दिव्या तुकाराम लाड , मनस्वी नरेश मेस्त्री , वैष्णवी मंगेश सुतार , साक्षी गणेश दळवी ,आर्या भिकाजी रासम, दिवेंशा सुभाष परब, गायत्री विलास खानविलकर, पृथ्वीराज वसंत चव्हाण ,अमोल उदय डिचवलकर , नामदेव आत्माराम तेली असे एकूण तेरा विद्यार्थी बसले होते हे सर्व विद्यार्थी पास होऊन इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा प्रशालेचा 100% निकाल लावला आहे. सन 2007 पासून आज पर्यंत प्रशालेचा सलग 17 वर्ष शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षाचा प्रशालेचा शंभर टक्के निकाल लावून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर अनंत यादव यांनी मार्गदर्शन केले. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संस्था अध्यक्ष श्री. विठ्ठल शिवाजी रासम, सचिव ॲड.श्री. प्रभाकर काशिराम वालावालकर तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री. आशुतोष अंकुश रासम व सदस्य, मुख्याध्यापक, पालक, शिक्षक व सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.