*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यामंदिरचे सुयश*
*कणकवली : प्रतिनिधी*
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कणकवली यांच्यामार्फत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यामंदिर प्रशालेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.स्वराज चव्हाण( प्रथम), मृणाल पाटील (द्वितीय), उबेद कदम ( तृतीय)
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या संगीता साटम,विलास ठाकूर,वैभवी हरमलकर आणि वेदांती तायशेटे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना
शि.प्र.मं. कणकवलीच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू ,अध्यक्ष दत्तात्रय तवटे,ट्रस्टी अनिल डेगवेकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. व्ही. जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.यावेळी कामगार कल्याणचे श्री नेवरेकर, पारकर गुरुजी तसेच इतर कर्मचारीही उपस्थित होते.