*कोंकण एक्सप्रेस*
*असनियेत बांधकाम कामगार आरोग्य शिबिराचे आयोजन*
*कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
भाजपा बांधकाम मोर्चा बांदा मंडलच्या पुढाकाराने असनिये येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये कोलेस्ट्रॉल,थायरॉईड,शुगर यासह रक्ताच्या एकवीस वेगवेगळ्या तपासण्या त्याचप्रमाणे कान,डोळे व फुफ्फुसाची तपासणी केली गेली.तसेच रुग्णांना औषधे देखील लगेचच वितरित करण्यात आली. दोनशे बांधकाम कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी बोलताना डॉ. चव्हाण यांनी आरोग्यविषयी काळजी तसेच या योजनेअंतर्गत होणाऱ्या तपासण्या याची माहिती उपस्थितांना दिली.
या शिबिरासाठी डॉ. संजय चव्हाण, रीया पाटील – परिचारिका,विशाखा गावडे – (ERT), स्वाती वालावलकर व स्नेहल परब – फ्लेबोटोमिस्ट यांनी आरोग्य सेवा दिली.यावेळी लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड देखील वितरित करण्यात आले.यावेळी असनिये सरपंच रेश्मा सावंत, गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, शरद सावंत, सुमंत असनकर, सुहानी ठीकार,भरत सावंत, दर्शना दामले,ग्रामसेवक मुकुंद परब आदी उपस्थित होते.खेडेगावात अशा पद्धतीचा आरोग्य मेळावा झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

