*कोंकण एक्सप्रेस*
*रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांचा सत्कार*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने भगवती हॉल,मळगाव येथे चार्टर डे साजरा करण्यात आला.यावेळी नेमबाजी क्रीडा प्रशिक्षक म्हणून मागील १७ वर्ष उत्तम कामगिरी करणारे व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवीणारे नेमबाजीचे एन.एस.एन.आय.एस प्रशिक्षक श्री.कांचन वसंत उपरकर यांचे रोटरी क्लबच्या वतीने वोकेशनल अवार्ड देण्यात आला.
त्याच बरोबर त्यांचा शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास बेळगाव वरून डिस्ट्रिक्ट गवर्नर रिप्रेजेंटेटिव श्री.अशोक नाईक ,एजी. विद्याधर तायशेटे,रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.प्रमोद भागवत,सचिव श्री. सुबोध शेलटकर, खजिनदार श्री. राजन हवाळ तसेच अन्य रोटरीयन्स उपस्थित होते.