*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस*
आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे.