*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फ़ूर्त प्रतिसाद :गौरांगी परब,वैष्णवी जाधव,समर्थ शिरसाट स्पर्धेचे विजेते*
*कणकवली :प्रतिनिधी *
तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कप्युंटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला.तिनही गटात मिळून एकूण २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत पहिल्या गटात गौरांगी परब, दुस-या गटात वैष्णवी जाधव तर तिस-या गटात समर्थ शिरसाट यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
शालेय मुलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि मानवाला उपजत मिळालेली लेखनशैली भविष्यात कार्यरत रहावी व अधिकाधिक विकसित व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. दोन वर्षे यशस्वी आयोजनानंतर चौथ्या वर्षीही या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळाला. हि स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन गटात घेण्यात आली.या प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तसेच उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन पुढील महिन्यात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे परिक्षण सुलेखनकार अभिजित राणे आणि सेवानिवृत्त शिक्षक अशोक अनंत मुद्राळे यांनी केले.यावर्षी सुप्रसिध्द कवी, लेखक,अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या सामाजिक आशयावरील कविता लेखनासाठी देण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
गट पहिला (पहिली ते चौथी) : (प्रथम तीन व उत्तेजनार्थ तीन) गौरांगी शैलेंद्र परब (जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, तळेरे नं. 1), स्वरा अमित तळेकर (जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, तळेरे नं. 1), पवन साईप्रसाद आमडोसकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा), ईश्वरी अभिजित मोरे (विद्यामंदिर कोकिसरे – नारकरवाडी), अथर्व ओंकार उरणकर (जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, तळेरे नं. 1), विहान वैभव आईर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस मुख्यालय)
गट दुसरा (पाचवी ते आठवी) : वैष्णवी हरिश्चंद्र जाधव, संकेत मिलिंद गावकर, रमिला कुमारी आशाराम देवासी, नेहल मारुती शिवडावकर (सर्व स्पर्धक शिवडाव माध्य. विद्यालय, शिवडाव), काव्या सूर्यकांत चव्हाण (खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा), गौरी श्रीधर सावंत (शिवडाव माध्य. विद्यालय, शिवडाव)
गट तिसरा (नववी ते बारावी) : समर्थ चंद्रकांत शिरसाट (शिवडाव माध्यमिक विद्यालय), श्रेया महेश तावडे (कासार्डे ज्युनिअर कॉलेज), श्रेयश जगदीश शिरसाट, पार्थ रामनाथ गोसावी, चेतन सत्यवान मेस्त्री, रीया सत्यवान मडव (सर्व विद्यार्थी शिवडाव माध्यमिक विद्यालय)
या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ तळेरे येथे होणार असून त्याबाबत विजेत्या स्पर्धकांना कळविण्यात येईल. तसेच, गेली 3 वर्षे ज्या शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला अशा शाळांनाही यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. यावेळी बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी मुलांसाठी काही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व विजेत्या स्पर्धकांनी आपल्या पालकांसह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे.
तसेच, गेल्यावर्षी विजेत्या स्पर्धकांनी आपली पारितोषिके घेऊन गेलेले नाहीत, त्यांनाही ती पारितोषिके वितरित करण्यात येणार असून अशा स्पर्धकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन अक्षरोत्सव परिवाराचे प्रमुख निकेत पावसकर, श्रावणी कप्युंटर एज्युकेशन्सचे संचालक सतिश मदभावे व श्रावणी मदभावे यांनी केले आहे.