*कोंकण एक्सप्रेस*
*सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा ) संस्थेने केला सन्मान*
*दोडामार्ग : प्रतिनिधी *
नूतन विद्यालय कळणे ता.दोडामार्ग येथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान,सिंधुदुर्ग विभाग यांनी आयोजित केलेल्या “शौर्या तुला वंदितो” सन्मान सोहळ्यात सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचा गौरव करण्यात आला. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, उपाध्यक्ष महेश राऊळ यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी जि. बॅंक संचालक गणपत देसाई, दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, मुख्याध्यापक महेंद्र देसाई, कुडासे हायस्कूल क्रीडा शिक्षक सोमनाथ गोंधळी, वनश्री फाऊंडेशन संस्थापक संजय सावंत, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुनिल राऊळ, सचिव दिपक करंजे, प्रशासक सिद्धेश परब तसेच दुर्गसेवक उपस्थित होते.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, ‘रक्तदान, देहदान, अवयवदान आणि रुग्णमित्र’ या संकल्पनेवर कार्यरत आहे. गेली पाच सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, तेलंगणा, पुणे, ठाणे बेळगाव येथे विस्तारलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.”जात धर्म पंथ न पाहता कुणालाही कोणत्याही वेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही संस्था निरंतर सहकार्य करते आणि आपण स्वतः याचा अनुभव घेतला आहे.” सह्याद्री प्रतिष्ठानचे सिद्धेश देसाई यांनी हे गौरवोद्गार काढताना म्हटले.