*कोकण Express*
*संत रोहिदासांची विचारधारा सर्वच समाजाला दिशादर्शक…*
*सुजित जाधव; जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा वर्धापन दिन व जयंती साजरी…*
*सिंधुदुर्ग,ता.०१:*
संत शिरोमणी गुरु रोहीदास महाराज यांचे चरित्र अलौकिक असून त्यांची विचारधारा सर्व समाजाला दिशादर्शक आहे.त्यांचे विचार सुमारे सहाशे वर्षांपूर्वीही पुरोगामी व विज्ञानवादी होते.जातीपातीची बंधने झुगारून आज सर्व समाजानी एकत्र येणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी संघटनेच्या वर्धापन दिन,संत रविदास जयंती व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ,सिंधुदुर्गच्या वतीने संत गुरु रोहीदास महाराज यांची जयंती,संघटना वर्धापन दिन व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ रविवारी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण,उपाध्यक्ष सुरेश पवार,सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,सहसचिव गुरुप्रसाद चव्हाण,मालवण तालुकाध्यक्ष सुनील पाताडे,माजी सरचिटणीस सुयोग धामापुरकर,बी.के.जाधव,प्रसिद्धी प्रमुख मंगेश आरेकर आदी उपस्थित होते.यावेळी दीपप्रज्वलन करून संत रविदास महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी श्रीराम चव्हाण,सुरेश पवार,गुरुप्रसाद चव्हाण,विजय चौकेकर,श्रद्धा पाटकर,वेदिका चव्हाण,प्रवीण लोखंडे यांनी रविदास महाराज यांचे साहित्य व सामाजिक विचार यावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी संत रोहीदास जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.खुला गट प्रथम क्रमांक-श्री.विजय रोहिदास चौकेकर (चौके,मालवण)द्वितीय क्रमांक-सौ.भाविका भावेश राणे,रेडी (वेंगुर्ले),तृतीय क्रमांक-श्री.वैभव खानोलकर (नेमळे, सावंतवाडी) उतेजनार्थ- श्री.प्रवीण भूपाल लोखंडे(ओरोस) व सौ.वेदिका देवेंद्र चव्हाण (मालवण). युवा गट प्रथम क्रमांक-श्रीम.चैताली चंदू पाटकर(सावंतवाडी), द्वितीय क्रमांक-श्रीम.श्रद्धा सतीश पाटकर(हुंबरठ, कणकवली), तृतीय क्रमांक-श्रीम.कृतिका लिलाधर रेडकर(उभादांडा,वेंगुर्ले), उत्तेजनार्थ क्रमांक-श्रीम.तन्वी गणपत चौकेकर(चौके,मालवण),श्रीम.रक्षन्दा नंदकुमार मालवणकर(जामसंडे,देवगड)
बाल गटातून प्रथम क्रमांक-कु.कौस्तुभ चंद्रसेन पाताडे(सुकळवाड,मालवण),द्वितीय क्रमांक-कु.श्रद्धा शरद जाधव(शिवडाव,कणकवली),तृतीय क्रमांक-कु.सलोनी रामदास कुणकवळेकर (कुणकवळे ,मालवण),उत्तेजनार्थ-कु.वैष्णवी मयूर मोचेमाडकर (कुंभारमाठ,मालवण),कु.श्रेयश सुयोग धामापूरकर(सुकळवाड,मालवण) या यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस श्री.चंद्रसेन पाताडे यांनी केले.