_आजपासून दूध 100 रुपयांनी विकले जाणार का? किसान मोर्चाने सांगितलं सत्य_

_आजपासून दूध 100 रुपयांनी विकले जाणार का? किसान मोर्चाने सांगितलं सत्य_

*कोकण Express*

 *_आजपासून दूध 100 रुपयांनी विकले जाणार का? किसान मोर्चाने सांगितलं सत्य_*

📍 _गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दुधाचे दरही शंभरी पार करणार असल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे._

🌾 *संयुक्त किसान मोर्चाचे म्हणणे*

▪️त्यांच्याकडून दूध विक्री करु नये किंवा त्याची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवावी असा कोणताही निर्णय झालेला नाही.

▪️किसान मोर्चाच्या नावाने सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ, मेसेज व्हायरल होत आहेत. त्यात शेतकऱ्यांनी दुधाची किंमत वाढवल्याचे सांगितले जात आहे.

▪️सोशल मीडियावर युनायटेड किसान मोर्चाच्या नावाने व्हायरल होत असलेल्या अशा मेसेजेस व व्हिडीओजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

▪️किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मोर्चाच्या नावाने एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

▪️या व्हायरल मेसेजचे उत्तर म्हणून किसान मोर्च्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असं आाहनही किसान मोर्चाने केले आहे.

💬 *अफवांमध्ये पसरवण्यात आलेला व्हायरल संदेश*

⛽ गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दुधाचे दरही शंभरी पार करणार असल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

☯️ ट्विटरवर #1मार्च_से_दूध_100_लीटर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याअंतर्गत असा दावा केला जात आहे की, 1 मार्चपासून दुधाची किंमत प्रति लिटर 100 रुपये असेल.

*मात्र, आता किसान मोर्चाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!